मुंबई/ प्रतिनिधी : वाढत्या कोरोनाच्या महामारीत सारा देश होरपळून निघाला असताना जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतानाच अव्वाच्या सव्वा वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गेली अनेक दिवस मराठी भारती संघटना या विरोधात लढत आहे. याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण राज्यात मुंबई, कल्याण, भिवंडी, विरार, नालासोपारा, पालघर, शिवडी, रे रोड, घाटकोपर, नेरुळ, उल्हासनगर, हिंगोली, सोलापूर, पुणे, भोर या अनेक विभागांमध्ये आज विजबीलाची होळी करण्यात आली. लोकांनी विजबिलाबद्दल आपला व्यक्त केला अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा ऍड. पूजा बडेकर यांनी दिली. लॉकडाऊन मुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाची उपासमारीने जीव जायची वेळ आली असताना वाढीव वीज बिल भरावे कसे ? हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाला पडला आहे. सामान्य नागरिक हे अव्वाच्या सव्वा आलेले वीजबिल भरू शकत. त्यामुळे सरकारने 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे तसेच १ एप्रिल २०२० रोजी झालेली विजदरवाढ रद्द करावी या मागणीसाठी मराठी भारती संघटनेने आंदोलन करून वाढीव वीज बिलाची होळी केली यामध्ये नागरिक सहभागी झाले होते.नागरिकांनी वीज बिलाने वाढविलेला असंतोष व्यक्त केला … जोगवा मागून पोट भरणाऱ्या वर्गाला आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले … आमच्या डोळ्यातलं पाणी सरकार ला दिसत नाही का ? असा सवाल मराठी भारतीच्या अध्यक्षा पूजा ताई बडेकर यांनी सरकारला केला. लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या कार्यध्यक्षा विजेता भोनकर यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आशिष गायकवाड, राकेश सुतार, अनिल हाटे यांनी वेगवेगळ्या विभागांचे नेतृत्व केले असल्याचे प्रवक्ता सोनल सावंत यांनी सांगितले. *****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *