मुंबई : राज्यात दलित बांधवांवर हल्ले होत आहेत, गेल्या सात दिवसात दोन घटना घडल्या. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हे हल्ले करण्यात आले दलितांवर अत्याचारात वाढ होत असून राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का ? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी पत्रकार परिषदेत केला. शासन आपल्या दारी योजनेचे नाव असेल तरी लाभार्थ्यांनाच सरकार पर्यंत यावे लागत , आणि डीपीडीसीचा निधी योजनेपेक्षा योजनेच्या जाहिरातीवर जास्त खर्च होत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही वड्डेटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
वड्डेटीवार म्हणाले की, नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मधील चार मुलांना सहा जणांनी अर्धनग्न केले मग त्यांना टांगून मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पिडितांमध्ये तीन दलित आणि एक मराठा समाजाचा तरुण आहे. शेळी आणि कबूतर चोरल्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.. जालना जिल्ह्यात देखील वाहन चोरीच्या संशयावरून एका दलित तरुणाला बेदम मारहाण झाली ज्यात त्याचा मृत्यू झाला वाहन चोरीच्या संशयावरून ही मारहाण झाल्याची माहिती आहे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, अशी टिमकी मिरवणाऱ्या ट्रीपल इंजिन सरकारच्या काळात हे अत्याचार वाढण्याचे कारण म्हणजे सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले आहे. हे ट्रिपल इंजिन सरकार आपल्या इंजिनमध्ये इंधन भरण्यात मश्गूल आहेत, अशी टीका विजय वड्डेटिवार यांनी केली.
शासन आपल्या दारी या शासकीय योजनेचे मोठे कार्यक्रम जिल्हा स्तरावर घेतले जात आहेत .पण या कार्यक्रमापेक्षा जाहिरातबाजी जास्त खर्च करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.या अभियानाकरिता १३ एप्रिल च्या शासन निणर्यानुसार ०.२ टक्के म्हणजे १ कोटी रूपयापर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु १८ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून हा निधी १ टक्के म्हणजेच ३ कोटी रूपयापर्यंत केलेला आहे.
तसेच या योजनेचे नाव शासन आपल्या दारी असेल तरी जनतेला सरकारच्या दारी म्हणजे जिल्हा स्तरावर या कार्यक्रमासाठी यावे लागते.. खरोखरच जनतेला या अभियानाचा लाभ द्यायचा असेल तर अधिकाऱ्यांनी सर्कल लेव्हलवर कॅम्प सुरू करून तेथे प्रमाणपत्र वाटप केले पाहिजे. असे केले असते तर खरोखच शासन आपल्या दारी आले असे सर्वसामान्यांना वाटेल. पण सरकार मात्र सर्वसामान्य व्यक्तीला जिल्हास्तरावर बोलवून प्रमाणपत्र वाटप करत आहेत. ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी त्यांचा पैसा खर्च होतो, त्यांचा वेळही वाया जातो, तसेच गर्दी जमेपर्यंत कार्यक्रमाला मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री येत नाही. त्यामुळे नागरिकांना वाट पाहत बसून राहावे लागते.. सरकारला खरेच नागरिकांना दारात सुविधा द्यायची असेल तर प्रमाणपत्र निदान तालुक्याच्या किंवा सर्कलच्या ठिकाणी द्यायला हवे.त्याचे यासंदर्भातील कँम्प्स सुरू केले पाहिजे अशी सूचना ही विरोधी पक्ष विजय वड्डेटीवार यांनी केली.
राज्यात पावसाने दडी मारली आहे. राज्यात कोकण विभाग सोडला ते फक्त ३४% पाऊस पडला आहे..त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे.पण सरकार मात्र ढिमम् आहे, काही करायला तयार नाही…त्यामुळे काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेतून आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधू असे ही विजय वड्डेटीवार म्हणाले.