नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला
नागपूर : हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur – Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे. नागपूर ते मुंबई असा ७०१ कि.मी. लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
वेगवेगळ्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आणि भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच नागपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. . त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
मोदींनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद …
वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी लेझीम आणि ढोलपथक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी उद्घाटनावेळी या लेझीम आणि ढोलपथकाच्या जवळ केले. नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी फेरफटका मारला. तसेच ढोलपथकातील एका वाजंत्र्याकडून काठी घेऊन ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. पंतप्रधान मोदी यांच्या या कृतीने ढोलपथकातील कलाकारांचा उत्साह चांगलाच वाढला. मोदींचा ढोल वाजवतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोदींचा मेट्रोने प्रवास …
पंतप्रधान मोदी यांनी नागपूर मेट्रोच्या फेज दोनचं भूमीपूजन केलं आणि नागपूर मेट्रोनं प्रवास केला. मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रदान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः समृद्धी महामार्गावरच्या प्रवासाचा अनुभव घेतला.
१० जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग …
मुंबई ते नागपूर ८१२ किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी १४ तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी ८ तास लागतील. ७०१ किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे. औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी ४ तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी ४ तास लागतील. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ५५ हजार ४७७ कोटी रूपये आहे. हा मार्ग राज्यातल्या १० जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग आहे.