डोंबिवली: : अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण मुंबईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री कपिल पाटील, आमदार चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वेसेवा प्रकल्पांचे लोकपर्ण संपन्न झाले. अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकातील संभाव्य गर्दी लक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदींनी त्या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करून लाखो प्रवाशांना दिलासा दिला असल्याचे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल.
कोपरच्या पश्चिमेला हा होम प्लॅटफॉर्म असून त्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी दानवे यांच्याहस्ते संपन्न झाला. भविष्यातील प्रवाशांना अपेक्षित असणाऱ्या सुविधांचा विचार करून त्या सेवा देण्यात येत आहेत. अशाच पद्धतीने आगामी।काळात जिथे आवश्यकता असेल त्या सर्व ठिकाणी पादचारी पूल, एस्क्लेटर, होम प्लॅटफॉर्मस आदी निर्णय झपाट्याने घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असल्याचे या प्रकल्पांवरून स्पष्ट होत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. अंबरनाथ स्थानकातील फलाट 280 मीटर लांबी आणि ८ मीटर लांब तर कोपर स्थानकातील 308 मीटर लांब ७.५ मीटर रुंद असे त्याचे स्वरूप आहे.