श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीने स्तुत्य उपक्रम
डोंबिवली : डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान संचलित श्री गणेश वैद्यकीय सुविधा केंद्र आणि अभ्यासिका – संगणक कक्षाचे आज उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.जयंत गोखले आणि ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, सचिव प्रवीण दुधे यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.
श्री गणेश मंदिर संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असून आणखी स्तुत्य उपक्रमाची भर पडली आहे वैद्यकीय सुविधा केंद्रामुळे गरजू रुग्णांना अल्पदरात योग्य ते उपचार मिळणार असून संगणक युक्त अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलबध झाली आहे.