डोंबिवली : लसीचे दोन डोस घेतलेल्याना १५ ऑगस्ट पासून लोकलमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या प्रवाशांनाच रेल्वेकडून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जातोय . कोरोना लसीकरण सर्टिफिकेटची पडताळणी केल्यानंतर ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने पास दिला जातोय मध्य रेल्वेवरील डोंबिवली रेल्वे स्थानकात सुमारे आठ हजार प्रवाशानी पास घेतलाय ही संख्या मध्य रेल्वेच्या इतर रेल्वे स्थानकापेक्षा सर्वाधिक आहे .
१५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी काल सुट्टी असल्याने रेल्वे स्थानकावर गर्दी नव्हती . आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डोंबिवली रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकी बाहेर पास काढण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळालं .डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात चाकरमनी वर्ग असून, मुंबईमध्ये कामानिमित्त ये-जा करत असतो मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद असल्याने कामगार वर्गाचे हाल झाले होते सरकारने रेल्वे प्रवासात निर्णय घेतल्याने डोंबिवलीकरांना मात्र दिलासा मिळालाय