मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी (उद्या) सोमवार १८ ऑक्टोबरला महत्वाची बैठक बोलावली आहे दुपारी तीन वाजता टास्क फोर्सची चर्चा करणार आहेत. कोरोनाची लाट ओसल्याने आता शाळा महाविद्यालय मंदिर उघडण्यात आली आहेत तर नाटयगृह चित्रपटगृह हे सुध्दा २२ ऑक्टोबरला उघडण्यात येणार आहेत. कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता मावळली आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे नोकरदार असो वा व्यापारी अथवा सर्वसामान्य नागरिक मोलमजूर सर्वांनाचा जबर फटका सहन करावा लागला आहे. सध्या महाराष्ट्र अनलॉक होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळत आहे.
एक डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास ?
लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकल प्रवास नाही. मॉलमध्ये जाण्यास परवानगी नाही. तसेच कोविशील्ड लसीमधील दोन डोसचं अंतर हे ८४ दिवसांचं आहे. त्यामुळे लोकांना असुविधा होत आहे. त्यामुळे आरोग्य सेतू अपमध्ये ज्या व्यक्तीचं स्टेटस सुरक्षित असेल, अशा लोकांना सवलती देता येईल का यासंदर्भात चर्चा केली जाईल. दिवाळीनंतर करोना रुग्णांची आकडेवारी काय असेल, यावरूनच एक डोस असलेल्या लोकांना प्रवासात सवलत देण्याबाबत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुंळे या सगळयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे काय निर्णय घेतात याकडं सर्वाचं लक्ष वेधलय.