फ्लाईंग स्क्वॉडसह विविध पथकांची तैनात करत निवडणूक प्रक्रियाची जोरदार तयारी सुरू
डोंबिवली :-केंद्र निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर 138 कल्याण पश्चिम मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. या मतदारसंघात एकूण 4,34,928 मतदारांची नोंदणी झाली असून, त्यात 2,28,788 पुरुष, 2,61,125 महिला, आणि 15 इतर मतदारांचा समावेश आहे. यासोबतच 140 सैनिक मतदार, 1,816 दिव्यांग मतदार, आणि 44 परदेशी मतदार देखील आहेत. या मतदारसंघासाठी 441 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, 137 मतदान केंद्रे विविध भागांमध्ये ठेवण्यात आली आहेत.
दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून कल्याण पश्चिम मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता पाळली जावी यासाठी फ्लाईंग स्क्वॉडसह विविध पथकांची तैनाती करण्यात आली आहे. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी टोल फ्री नंबर देखील देण्यात आलेला आहे.लोकसभा निवडणूक 2024 मध्ये या मतदारसंघात एकूण 4,03,138 मतदार होते. या वर्षी 35,000 पेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाने शाळा, महाविद्यालये, आणि सोसायट्यांमध्ये विशेष नोंदणी अभियान राबवले आहे. यामुळे मतदान टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा आहे