ठाणे : येऊरच्या जंगलात वृक्षतोड करणा-यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून वनविभागाच्या हवाली केले होते. पण दुस-यां दिवशी ते फरार झाले.  गेली पाच वर्षे उलटूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने  येऊर एन्व्हायर्नमेंटल सेासायटीने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि  येऊर परिक्षेत्र वनअधिकारी गणेश सोनटक्के यांच्याकडे  साकडं घातलं आहे. येउरमधील संवेदनशील ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही चे जाळे बसविण्याची मागणीही करण्यात आलीय. पुरावे आणि गुन्हेगारांना पकडून दिले असतानाही कारवाई होत नसल्याने कर्मचा-यांचे गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याचा आरोपही येऊर सोसाटीने केल्याने आता गुन्हेगारांना कुणाचं अभय ? असा सवाल उपस्थित होत आहे,

अवैध शिकार, जंगल क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि आता अवैध वृक्षतोड  असा सगळा प्रकार येऊरच्या जंगलात सुरू आहे. या विरोधात  येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी लढा देत आहे. येऊर पाटोण पाडा येथील स्थानिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे, रमेश दळवी व अन्य ग्रामस्थांनी संरक्षित जंगल क्षेत्रातील वृक्षतोड करणा-या समाजकंटकांवर पाळत ठेवून ७ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता त्यांना रंगेहात पकडले. संरक्षित जंगल क्षेत्रातील वृक्षतोड करून तोडलेल्या ओडक्यांची वाहतूक ट्रकमधून जात असतानाच कार्यकत्यांनी हा ट्रक येऊर मधुबन चौकीजवळ अडवला त्यावेळी रात्र पाळीस कार्यरत असणा-या चौकीदारांना झोपेतून उठवले, व या बेकायदेशीर कृत्याबबात फिर्याद दिली त्यावेळी कायदेशीर कारवाईचे आदेश अधिकारी असणारे संबधित कर्मचारी दुस-या दिवशी सकाळी येणार असल्याचे सांगत सदर ट्रक चौकीदारांनी जमा करून घेतला व कार्यकत्यांनी घरी जाण्यास सांगितले. रात्री दीड वाजता पोलीस कंट्रोल रूमला वर्दीही देण्यात आली मात्र दुस-या दिवशी ८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कार्यकत्यांनी पून्हा मधुबन चौकी येथे भेट दिली असता त्या ट्रकमधील चालक व इतर साथीदार फरार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा सगळा प्रकार त्यांनी निवेदनात कथन करण्यात आला आहे.

 वनविभागाची कारवाई गुलदस्त्यात ! 
दोनच महिन्यांपूर्वी येऊर पाटोणपाडा व जांभूळपाडा यामधील सव्र्हे नंबर १७ येथील वनीकरणासाठी राखीव असलेल्या सुमारे १० एकर शासकीय जमिनीवर खाजगी व्यक्तीद्वारे अतिक्रमणाचा प्रयत्न होत असतनाही स्थानिक आदिवासी व संस्थेच्या कार्यकत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिकार करीत तो हाणून पाडला हेाता या वेळेलाही जेसीबी मशीनद्वारे येथील वृक्षांना समाजकंटकांनी क्षती पोहोचवल्याचे पुरावे वनखात्यास दिले होते. तसेच अतिक्रमण करताना कुंपण बांधण्यासाठी आणलेला एक टेम्पो पकडून दिला होता. यावरही वनविभागाची कारवाई अजूनही गुलदस्त्यातच असल्याचेही येऊर एन्व्हायर्नमेंटल सेासायटीने निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *