खाडीपट्टयात खाडीकिनारी अवैद्य बांधकामे आणि भराव
महाड: निलेश पवार महाड खाडीपट्टा विभागात गेली अनेक वर्षे रेतीचा व्यवसाय होत आहे. कांही वर्षापासून पारंपारीक रेती व्यवसाय मागे पडून यामध्ये सक्शन पंपाचा वापर वाढला आहे. या सक्शनने काढलेली वाळू होडीने नदीकिनारी आणली जाते. ही वाळू किनारी उतरवण्याकरीता खाजगी प्लाॅट धारकांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून जेट्टीची बांधकामे केली आहेत. शिवाय खाडीत भराव देखील केला आहे. यामुळे सावित्रीचा किनारा पर्यावरणदृष्टया धोक्यात आला आहे.
महाड तालुक्यात वराठी गावापासून तुडील तर पलीकडच्या बाजुने कोकरे ते दासगावपर्यंत वाळू व्यवसाय होत आहे. गेली अनेकवर्षापासून मासेमारी करणारे खाडीपट्टयातील ग्रामस्थ सावित्रीच्या प्रदुषणामुळे रेती व्यवसायाकडे वळले आहेत. हा रेती व्यवसाय हातपाटी पद्धतीने सुरू होता मात्र त्यामध्ये आता यंत्राची भर पडली आहे. यामुळे बुडी मारून रेती काढण्याची पद्धत मागे पडली. या यंत्रांनी मात्र किनाÚयांची आणि खाडीचे फार मोठे नुकसान होत असले तरी स्थानीक प्रशासन कानाडोळा करत असल्याने या व्यवसायीकांचे चांगनलेच फावले आहे. वाळू व्यवसायात सक्शन पंपाची भर पडली आहे. या सक्शन पंपाने खाडीपट्टा विभागातील अनेक गावातील जमिनींचे नुकसान झाले आहे. प्रशासनाची याला परवानगी नसली तरी वाळू व्यवसायीक आणि प्रशासन यांच्यातील आर्थीक बोलीमुळे स्थानीक प्रशासन कारवाई करण्याकडे कानाडोळा करत आहे. या सक्शन पंपामुळे वाळू काढण्ण्याचे काम सोपे झाले असले तरी खाडी आणि परीसराचे मात्र मोठे नुकसान होत आहे.
महाड खाडीपट्टयातील वाळूला कायम मोठी मागणी आहे. या मागणीमुळे महाडमधील वाळू व्यवसाय अल्पावधीत तेजीत आला. कमी वेळेत मोठया प्रमाणात वाळू काढण्याकडे वाळू व्यवसायीकांनी लक्ष वेधले. यामुळे मुळ परवाणगीपेक्षा सक्शन पंप रात्रभर चालू लागले. सक्शनमुळे मोठया प्रमाणात वाळू निघू लागली पण वाळूबरोबर रेजगा देखील निघू लागला. हा रेजगा प्रमाणाबाहेर येवू लागला. वाळू चाळून झाल्यानंतर उरलेला खडी रहीत रेजगा टाकायचा कोठे असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मोकळया जागा, खाजगी प्लाॅट, रस्त्याच्या बाजूला हा रेजगा टाकण्याचा सपाटा वाळू व्यवसाष्ीकांनी लावला. आज अनेक ठिकाणी हा रेजगा टाकलेला दिसून येत आहे. खाडीकिनारी वाळू व्यवसाय करत असलेल्या व्यवसायीकांनी स्वतःच्या प्लाॅटला भराव म्हणून याचा वापर करत चक्क खाडीत भराव केला आहे. खाडीत किमाण 100 ते 200 फुट आत जावून भराव केला आहे. याबाबत स्वतः प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी देखील पाहणी केली आहे. मात्र या प्लाॅटधारकांवर ठोस कारवाई झालेली नाही.
खाडी संबधीत विभाग असलेल्या महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी तर खाडीपट्टा विभागाकडे तर फिरकत देखील नाहीत. संपूर्ण खाडीमध्ये होत असलेल्या हालचालींवर या विभागाचे लक्ष असणे गरजेचे असताना देखील अवैद्य रित्या होत असलेल्या बांधकामांवर या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय पर्यावरण दृष्टया खाडीमध्ये होत असलेला भराव धोकादायक आहे. खाडीचे पात्र खाडीतील रेजगा काढून खोली वाढत असली तरी एकीकडे रूंदी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे भविष्यात किनाÚयांना आणि बाजूूच्या गावांना पुराचा धोका निर्माण होवू शकतो. खाडीकिनारी कोणतेही बांधकाम करावयाचे झाल्यास मेरीटाईम विभागाची परवाणगी आवश्यक असते मात्र याठिकाणी विनापरवाणगी सक्शन करीता छोटया जेटीवजा बांधकामे केली जात आहेत. याकडे संबधीत विभाग कानाडोळा करत आहे.