फेरीवाल्यांप्रमाणेच बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाई करा
प्रवाशांची मागणी
घाटकोपर ( निलेश मोरे ) : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांवर १५ कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र फेरीवाल्यांप्रमाणचे रिक्षा चालकही स्टेशन परिसरात अस्ताव्यस्तपणे रिक्षा उभ्या करीत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते त्यामुळे फेरीवाल्यांप्रमाणे अनधिकृत व बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून हेात आहे.
फेरीवाले प्रमाणे अनधिकृत रिक्षा चालक हे रेल्वे स्थानका बाहेर बेशिस्तीत रिक्षा उभ्या करतात आणि स्थानका बाहेर शेअर रिक्षा युनियनचे स्टॅन्ड लागत असल्याने प्रवाशी शेअर रिक्षा पकडण्यासाठी रस्त्याच्या मध्य भागी उभे राहून लांबच लांब रांगा लावतात. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना रेल्वे प्रवाशाना तारेवरीची कसरत करावी लागते. वाहतूक कोंडी सारखा प्रश्न देखील निर्माण होतो . त्यामुळे रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत उभ्या असणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करा अशी मागणी आता सामान्य रेल्वे प्रवाशांकडून जोर धरत आहे. एल्फिस्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर एका अफवेने बचावासाठी उडालेल्या गोंधळात चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप नागरिकांचा बळी गेला या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सामान्य प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवित ५ ऑक्टोबर रोजी रेल्वेच्या मुख्याल्यावर हजारोंचा संख्येने संताप मोर्चा काढला . या मोर्चातुन राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोंढ्याना टार्गेट करत रेल्वे स्थानक आणि रेल्वे पुलावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर १५ दिवसांत कारवाई कारण्याचे प्रशासनाला निवेदना द्वारे सूचित केले . 15 दिवसांत फेरीवाले मुक्त करण्यात आले नाही तर 16 व्या दिवशी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील अशी भूमिका घेत राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनावर दबाव आणला . दरम्यान मनसेच्या या अभूतपूर्व मोर्चा नंतर सामान्य प्रवाशानी मनसेच्या या भूमिकेचे स्वागत करीत आहेत.