मुंबई/ प्रतिनिधी : एल. पी. जी गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ‘प्रीपेड एल. पी. जी रिफिल्चा पर्याय निवडा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा’, असे आवाहन चेंबूरमधील एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे येथील गॅस सिलिंडर ग्राहकांना गॅस बुकिंग आणि कॅशलेस पेमेंट अदा करणे ग्राहकांना सहज आणि सोपे जाणार आहे..
गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या सेवेत असलेल्या एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘करो डिजिटल, रहो बेफिकर’! चा नारा आधीच दिला आहे. त्याअंतर्गत easy to book safe to pay हा सुरक्षा मंत्र आता प्रत्येक ग्राहकांच्या पसंतीस उतरतो आहे. असंख्य ग्राहकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीच्या कॅशलेस मोहिमेला जोरदार प्रतिसाद दिला आहे. या मोहिमे अंतर्गत व्हाट्सऍप बुक टू ‘९२२२२ ०११२’ या क्रमांकावर घरपोच एच. पी. गॅस सिलिंडरची नोंदणी आणि पैसे अदा करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *