मुंबई/ प्रतिनिधी : ग्राहकांची सुरक्षा हेच आमचे आद्यकर्तव्य मानून कोरोनापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी चेंबूरमधील एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीने ग्राहकांसाठी कॅशलेस अर्थात डिजिटल पेमेंट सेवा आणली आहे. महिन्याच्या दर बुधवारी एक दिवस कॅशलेस पेमेंट सेवेचा असणार आहे. कोरोना संक्रमण टाळून आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी जास्ती जास्त ग्राहकांनी ‘कॅशलेस’ सेवेचा वापर करावा, असे आवाहन वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीने केले आहे.

याअंतर्गत मास्टर कार्ड, amazon HPPAY, Paytm EZY GAS, RuPaY BBPS BHIM, UPI G pay, VISA, HP GAS मार्फत कॅशलेस पेमेंट करता येणार आहे. तसेच तात्काळ सेवा आणि मदतीसाठी २४ तास Mechanic Help आणि 24 तास LPG Emergency Helpline Number 1906 येथे ग्राहकांना सेवा उपल्बध असणार आहे.

रिफील बुकिंग कसे करणार?
चेंबूरमधील वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीच्या चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे येथील असंख्य गॅस सिलिंडर ग्राहकांना कोरोना संक्रमण काळात सुरक्षित सेवा देण्यासाठी 888882 3456, 942042 3456 या मोबाईल क्रमांकांवर गॅस रिफील बुकिंग करता येणार आहे. तसेच Whatsapp Book 9222201122 हा क्रमांक LPG गॅस रिफील बुकिंगसाठी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!