मुंबई : मुंबई पोलिसांनी विमानतळावर सापळा रचून सेक्स टूरिझम रॅकेटचा पर्दाफाश केलाय. विमानातून भूर्रर होण्यापूर्वीच आरोपींना पोलिसांनी गजाआड केलय. अबरुन खान आणि वर्षा परमार अशी अटक करण्यात आलेल्या महिला दलालांची नावे आहेत. या महिला दलालांच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलले जात होत विशेष म्हणजे या मुलींना दोन ते चार दिवस ग्राहकांसोबत एखाद्या टूरिस्ट स्पॉटवर पाठवलं जायचं. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यांनी बोगस ग्राहक पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलय. मुंबईहून गोव्याला रवाना होत असतानाच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्यांना विमानतळावर अटक केलीय.
अस चालायचा सेक्स टूरिझम ….
प्रथम ग्राहकांना हेरलं जायचं, त्यांना मुलींचे फेाटो दाखवले जायचे, त्यानंतर डील व्हायची. दोन दिवसांसाठी ग्राहकांकडून ५० हजाराच्या आसपास रक्कम घेतली जायची. एकदा व्यवहार ठरल्यानंतर त्या ग्राहकाला एखाद्या टूरिस्ट स्पॉटची एअर तिकिट काढायला सांगितले जायचे. त्यानंतर मुलीला ग्राहकासोबत पाठवले जात. हे रॅकेट प्रत्येक मुलीकडून २० टक्के कमिशन वसुल करायचे. टूरिस्ट स्पॉटवर हे जोडपं बनून वावरत असल्याने तिथल्या यंत्रणांना कोणताही संशय येत नाही. विशेष म्हणजे मुंबईत हा प्रकार घडत नसल्याने मुंबई पोलिसांना चकवा देणे सोपं जात होतं. पण जास्त काळ पोलिसांच्या डोळयात धुळ फेकणे शक्य झालं नाही. आणि या रॅकेटचा पर्दाफाश झाला. मात्र या रॅकेटचा पर्दाफाश झाला असला तरी मुंबईत अजून अशाप्रकारचे किती रॅकेट कार्यरत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.