कल्याण : कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत इंडियन आयडॉल मराठी स्टार गायक अनिकेत घनगव यांच्या ब्रँड परफॉर्मन्ससह कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 8 कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.
कचरा विलगीकरणासाठी केडीएमसीला मदत करण्यासाठी 50 महिलांची टीम तयार करणाऱ्या रेखा लाखे, 10 हजार 750 लॅप्स पूर्ण करण्याचा आणि स्केटिंगमध्ये 81 तासांत विक्रम मोडणाऱ्या आस्था नायकर, 11 वर्षीय ट्रेकर हिला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ले ट्रेकिंगसाठी पुरस्कार मिळाला त्या श्रावणी गायकवाड, प्रसिद्ध मराठी लोक लावणी नृत्यांगना विजया कदम, कल्याणमधील पत्रकार राजलक्ष्मी पुजारे, केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनिता परदेशी आणि महामारीच्या काळात प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या वंदना लोखंडे या आठ कृर्तृत्ववान महिलांचा कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वपोनि बशीर शेख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.