डोंबिवली : बुधवार, १७ जानेवारी २०२४ संध्याकाळी ठीक ८ वाजता सागर्ली रिक्षा स्टँड येथील रिक्षाचालक बुवा काका, यांना त्यांच्या रीक्षा मध्ये एक महीला पॅसेंजर ची पर्स सापडली. रिक्षाचालक बुवा यांनी या संदर्भात आपल्या मनसेचे हरीश पाटील शहर संघटक यांच्या शी संपर्क केला.

पर्स ची तपासणी केली असता, त्यात एक तोळयाचा कानातील सोन्याचा दागिना सापडला, तसेच 8000 हजार रोख रक्कम आणि आधार कार्ड सापडले. लागलीच हरीश पाटील यांनी आधार कार्ड वरील पत्त्यावरून डोंबिवली पच्छीम येथे राहणाऱ्या सौ. सुप्रिया खोरे यांच्याशी संपर्क केला, व स्वता घरी जाऊन सुप्रिया ताई ना दागिने व रोख रक्कम परत केली.

तसेच इमानदार रीक्षा चालक बुवा यांचे अभिनंदन केले. व योग्य तो सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग २४ च्या वतीने करण्याचे ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!