गाड्यांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही

कल्याण : – कल्याण मधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली . या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभे असलेल्या गाड्यांचा नुकसान झालं तर दोन जण किरकोळ जखमी असल्याचे माहिती आहे . सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही .

सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे , 24 तास या रस्त्यावर वर्दळ असते याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हा होर्डिंग कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . होर्डिंग बाजूला करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंग वर कारवाई कधी होणार असां सवाल विचारला . घाटकोपर मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते .मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय . या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *