ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे या पाच अक्षरी नावात मोठी ताकद होती. २४ तास ३६५ दिवस ते लोकांची सेवा करायचे .ठाण्याच्या आनंद आश्रमात  अडला, नडलेला, पिचलेला प्रत्येकजण आपल्या तक्रारी, गाऱ्हाणे आनंद दिघे यांच्याकडे मांडत.. आणि त्यानंतर  त्याचे काम फत्ते होऊनच आश्रमाबाहेर पडत. त्यामुळे पहाटे पासून ते मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या आश्रमात लोकांची गर्दी असे. आनंद दिघे यांच्या संस्कारात वाढलेले त्यांचे पुतणे केदार दिघे हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत सामाजिक कार्य करीत आहेत. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान च्या वतीने कोकणातील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. 


धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानने प्रत्येक संकटाच्या वेळी दिघे साहेबांचे संस्कार अंगिकारून, मदत नव्हे तर आपले कर्तव्य समजून लोकांच्या सेवेस तत्परता दाखविली आहे.. कारोना महामारी असो किंवा दुष्काळ, किंवा पूरग्रस्त भागात सेवा असो, वेळोवेळी प्रतिष्ठाननी आपले कर्तव्य बजावले आहे. कोरोना महामारी, प्रतिष्ठानच्या पनवेल विभागा तर्फे जवळपास १२००० लोकांना जेवणाची व्यवस्था, पालघर विभागा तर्फे १००० कुटुंबांना दोन महिन्यांचे घरगुती जीवन उपयोगी सामान, तसेच ठाणे व पालघर येथील पोलिस व कोरोनातील field workers साठी जेवणाचे आयोजन केले. ठाण्यातील पत्रकारांसाठी धान्य व इतर सामग्री चे आयोजन केले आहे. 


 कोकणातील पूरग्रस्तांना प्रतिष्ठानने  मदतीसाठी हात दिला आहे. पुरग्रस्तांसाठी १५००० पानाच्या बॉटल, १००० किलो धान्य,  बिस्कीट, डेटॉल, फेनायल, sanitary pads अशा अनेक जीवन उपयोगी सामानाचा पुरवठा करण्यात आला. आनंद दिघे साहेब यांचे संस्कार आणि आशीर्वाद ह्या पुढेही प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहतील असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *