डोंबिवली, 23 फेब्रुवारी, (हिं.स) : प्राणिक हिलींग फॅमिली इंडिया व ईगल ब्रिगेड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्की (Turkey) येथे झालेल्या भुकंपातील भूकंपग्रस्तांसाठी दैनंदिन जीवनातील गरजेची सामग्री पाठवण्यात आली.

यात वैद्यकीय सामान, गरम कपडे, खाद्यसामग्री, मुक्कामासाठी आवश्यक तंबू अशा वस्तू तुर्की दूतावासाने नामाकिंत केलेल्या ठिकाणावर जमा करण्यात आल्या आहेत.

जेणेकरून तुर्कीत सामान्यजन, वृद्ध व्यक्ती, महिला किंवा लहान मुले यांचे जीवन विस्कळीत झाले आहे म्हणून अत्यावश्यक सामानाची पूर्तता होईल या हेतूने हे कार्य करण्यात आले आहे. ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच सुचेता पांडे, संगीता पांडे, अक्षता पांडे व अस्मिता पांडे यांनी देखील यावेळी सहभाग नोंदवला व सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!