ठाणे, दि. ८ : मुसळधार पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी ठाणे, मुंबईकरांना फटका बसला. आज शुक्रवारी) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली. कोसळलेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील पाचपाखाडीतील नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन गणेशोत्सवात पाचपाखाडीतील घराघरांमध्ये पाणी घुसले. मुसळधार पावसात ठाणे महापालिकेचा आपत्कालीन विभाग कागदावरच असल्याचे दिसून आले
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने पुरेशी तयारी केली नव्हती, असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय.पाचपाखाडी परिसरातील महापालिका मुख्यालयासमोर, नुरी बाबा दर्गा परिसर, चांदीवाला कॉम्प्लेक्ससमोरील गणेशवाडी, संतोषवाडी, साबळेवाडी, जोंधळीबाग परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. ऐन गणेशोत्सवात घरात पाणी तुंबल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या काळात आपत्कालीन विभागाकडून काहीही हालचाल झाली नाही.
दरम्यान, पाचपाखाडी परिसरातील नाल्यांमध्येच मलनिस्सारण वाहिन्यांचे मोठे चेंबर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येतो. त्यातच यंदा नालेसफाईकडे दुर्लक्ष केले आहे. सखल भागाला पाणी तुंबण्याचा फटका बसत आहे. तब्बल ५०० कोटी रुपये खर्चूनही मलनिस्सारण योजनेचे चेंबर गटारात कसे उभारले, असा सवाल पवार यांनी केला आहे.
रेल्वे सेवा कोलमडली ….
मुसळधार पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी चाकरमण्यांना फटका सहन करावा लागला. आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे. लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कळवा आणि मुंब्रा दरम्यान जलद मार्गावर पाणी साचलेल्याने त्या मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प आहे. तर धीम्या मार्गावरही लोकल वाहतुक रखडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले आहे.
आपत्कालीन व्यवस्था..कोलमडली .
सर्वत्र ‘ चौकिदार’ कायम जाग्रुत हवेत .
आणि चौकशीचे मालक…आम जनता..करदाते च आहेत .