शहापूर : कोविडनंतर कुठेतरी शाळा सुरू होण्याची चिन्हे होती. पण मुसळधार पावसात शाळाच कोलमडली. अशी अवस्था  झालीय, शहापूर तालुक्यातील आदिवासी भागातील स्वातंत्रवीर राजगुरु विद्यालयाची ! गोरगरीब आदिवासी मुले या शाळेत शिकत आहेत. त्यामुळं आदीवासी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी  प्रशासनाबरोबरच, आपल्या प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुसळधार पावसात शाळेची पडझड झाली असून शाळेचे छप्पर उडाले आहे. ही शाळा दुर्गम भागात असून येथे शिक्षण घेणारे सर्व गोर गरीब आदिवासी शेतमजुरांची मुलं आहेत. या शाळेत शिकवणारे शिक्षक ही अतिशय जिद्दी व मेहनती आहेत.गेली १८ वर्ष त्यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन या विद्यार्थ्याना ज्ञानदानाचे पवित्र काम करीत आहेत.  २ वर्षांपासून फक्तं २०% अनुदान आहे, कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाही. शिक्षकांची ही स्थिती बिकट आहे,तरीही ते अतिशय प्रामाणिकपणे आपल काम उत्तम रीतीने करत असून,देशाचे आधारस्तंभ घडवीत आहेत.शाळेला उभी करण्यासाठी सर्वांच्या मदतीची खूप गरज आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपणास शक्य होईल तशी मदत करावी असे आवाहन शाळेतील शिक्षकांनी केले आहेसंपर्क : मुख्याध्यापक कोर सर  9096622761 आणि शिक्षिका पडवळ मॅडम  9209535797

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Likdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा ) ———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *