मुंबई : परतीच्या पावसाने राज्यातील विविध भागासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई कल्याण डोंबिवली परिसराला झोडपून काढले. मुसधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठया नुकसानीला सामोरे जावे लागलय. अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. राज्यात येत्या ४ ते ५ दिवसांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. कापूस, सोयाबीन आणि भात पिकाला पावसाचा फटका बसला आहे. आज आणि उद्या म्हणजे ७ आणि ८ ऑक्टेबर असे दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. तर ९ आणि १० ऑक्टोबरला पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता उर्रवरीत महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर ११ ऑक्टोबरला कोकणातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाडा वगळता उर्वरीत महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस
शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरात अति तीव्र सरींची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले होते. त्यामळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मुंबईत झालेला पाऊस
मुंबई शहर 70-100 mm
पूर्व उपनगर 40-70 mm
डोंबिवली 121.5 mm
ठाणे कल्याण 70-100 mm