डोंबिवली / प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनयुएचएम आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला शासनाच्या समान काम, समान वेतन अंतर्गत वेतन व भत्ते देण्यात यावे अशी मागणी माजी विरोधीपक्षनेते व मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भोईर, नगरसेविका सरोज भोईर यांनी महापौर विनिता राणे यांच्याकडे एक निवेदनाद्वारे केली आहे.

जगभरात हाहाकार माजविलेल्या कोविड – १९ सारख्या भयंकर महामारीच्या साथरोग काळातही हे कर्मचारी आपली सेवा व कर्तव्य इमाने इतबारे बजावत होते. मात्र त्यांना त्यांच्या कामाचा भत्ता मिळाला नसल्याचे समजते.दिवसेंदिवस होणारी वाढती महागाई व कोरोना काळातील लॉक डाऊनच्या कालावधीतील अर्थकारणाची झालेली कोंडी, त्यामुळे अल्प वेतनात आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे या कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे एनयुएचएम आरोग्य कर्मचारी यांना महापालिकेने निदान शासन आदेशाप्रमाणे समान काम, समान वेतन देणेबाबत विचार होणे आवश्यक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी कोरोना कोविड १९ या साथरोगाच्या संकटकाळात महापालिकेचे काम केले असल्यास त्याची सविस्तर माहिती घेऊन काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देऊन त्यांना न्याय द्यावा याकडे नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांनी महापौरांचे लक्ष आहे.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *