मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुख्यालय (आरोग्य भवन) आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र शासन मुंबई अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा शनिवारी आरोग्य भवन च्या पटांगणात मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रतापगड या संघाला अंतिम विजेतेपद तर रायगड संघाने उपविजेतेपद पटकावले. मर्यादित षटकांच्या अंडरआर्म पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या क्रिकेट स्पर्धांमध्ये आरोग्य भवनमधील विविध विभागांत काम करणाऱ्या खेळाडूंनी सहभाग घेतला.
एकूण दोन गटात स्पर्धा विभागली गेली. विशेष म्हणजे प्रत्येक संघाना शिवरायांच्या गडाचे नाव देण्यात आले. अ गटामध्ये सिंहगड, प्रतापगड, लोहगड, राजगड तसेच ब गटामध्ये विशाळगड, रायगड, तोरणा, शिवनेरी अशा आठ संघांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेत प्रतापगड या संघाने अंतिम विजेतेपद तर रायगड या संघाने उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून जितेंद्र नागवेकर, गोलंदाज म्हणून संदीप सावंत तर अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून संदेश मोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूचा एक वाचनीय पुस्तक भेट देऊन सामनावीर म्हणून गौरव करण्यात आला. सर्व वाचनीय पुस्तके वैभव पाटील यांच्या कडून देण्यात आली या स्पर्धांमध्ये विभागातील ७० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ संजीवकुमार जाधव, सहायक संचालक आरोग्य सेवा.डॉ. दुर्योधन चव्हाण सहाय्यक संचालक मुख्यालय संचालक कक्ष मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा शैलेश पाटणकर यांनी भेट दिली. कर्मचाऱ्यांचा कामातील उत्साह वाढवण्यासाठी, सुदृढतेसाठी तसेच टीम वर्क म्हणून कार्यरत राहण्यासाठी अशा प्रकारच्या कीडा स्पर्धा उपयुक्त असल्याचे मत सहाय्यक संचालक ( मुख्यालय संचालक कक्ष) डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी व्यक्त करत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयुक्तालय क्रीडा समिती राजेश भंकाळ, विजय पोस्तुरे, जितेंद्र नागवेकर, प्रताप पालांडे, संतोष मळेकर, भानुदास (योगेश) विशे, सचिन लेंभे, महेश लोखंडे, रोहित राणे, संदीप सावंत, हरिश्चंद्र गायकवाड, रोहन चौधरी, दीपक म्हात्रे छायाचित्रकार- संजय खापरे, स्पर्धेतील पंच -रोहन चौधरी तसेच… गुणलेखक-संतोष मेश्राम व वैभव पाटील…. यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या क्रीडा व संस्कृतीक समिती सदस्यांनी कंबर कसून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.