डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी : पालिका  कर्मचार्यांना शिवीगाळ

कल्याण (आकाश गायकवाड): डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करत अडथळा निर्माण करणार्या फेरीवाल्यां विरोधात महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली असताना दोन फेरीवाल्यांनी फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी अधिकार्यांना शिवीगाळ करत अंगावर धावून जात कारवाई स विरोध केला या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात सिकंदर नावाच्या फेरीवाल्यासह त्याच्या साथीदारविरोधात गुन्हा दाखल केला आहे

शिवसेने पाठोपाठ मनसेने हि शहरातील रस्त्यावर बेकायदेशीर.   ठाण मांडणाऱ्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता .या पार्श्वभूमीवर फेरीवाल्याविरोधात कारवाई ची मागणी जोर धरु लागली होती .या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने फेरीवाल्या विरोधात कडक कारवाई सुरु केली दरम्यान कारवाई दरम्यान मुजोर फेरीवाल्यांकडून पालिका अधिकारी कर्मचार्यांना धक्काबुक्की शिवीगाळ करण्याच्या घटना घडल्या आहेत . बुधवारी सायंकाळी पालिकेचे पथक फेरीवाल्यांवर कारवाई साठी डोंबिवली पूर्वेकडील पाटकर रोड येथे धडकले मात्र कारवाई सुरु होताच संतापलेल्या सिकंदर नावाच्या फेरीवाल्यासह त्याच्या साथीदाराने पालिकेच्या पथकातील अधिकारी कर्मचार्यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावूनजात कारवाई विरोध केला .या प्रकरणी सदर कर्मचार्याने डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार डोंबिवली पोलिसांनी सिकंदर सह त्याच्या साठीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *