मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तरूणाची आत्महत्या
मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन हर्षल रावते या तरुणाने आत्महत्या केली आहे. हर्षल रावते हा 43 वर्षांचा होता. हर्षल मुंबईतील चेंबुरमधील रहिवासी होता. हर्षलच्या वडिलांचं चेंबुरमध्ये मसाल्याचं दुकान आहे. हर्षल हा आज मंत्रालयात गृह विभागात कामासाठी आला होता. त्यावेळी त्याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला. हर्षलच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मेहुणीच्या हत्येप्रकरणी हर्षल रावते दोषी होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो 302 च्या कलमाअंतर्गत 2014 सालापासून औरंगाबादमधील पैठण ओपन जेलमध्ये शिक्षा भोगत होता. 10 जानेवारीपासून हर्षल रावते पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. त्याला 30 दिवसांची पॅरोलची रजा मंजूर झाली होती. असे ही समजते.
https://youtu.be/q0cZseLFbhE