हार्दिक पटेलकडून काँग्रेस गिरवणार सोशल मिडीयाचे धडे
मुंबई : आजच्या युगात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पहिले जाते. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूसदेखील आपले विचार, आपल्या भावना जगासमोर मांडू शकतो. या सोशल मीडियाचा अचूक आणि प्रभावी वापर कसा करावा, याविषयी हार्दिक पटेल मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमला मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी हार्दिक पटेल मुंबईला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते संध्याकाळी ४ वाजता मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस नेत्यांची घरवापसी
काँग्रेस सोडून भाजप मध्ये गेलेले माजी आमदार वीरेंद्र बक्षी आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज दुबे, राजा मीरानी आणि रमेश पारीख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजप सरकारच्या मनमानी कारभाराला कंटाळून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.उद्या गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजी, दुपारी १ वाजता, मुंबई काँग्रेस कार्यालय, आझाद मैदान मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.