गुरूनानक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शांतीवन मध्ये दिवाळी !
ठाणे (प्रतिनिधी) : दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण. यावर्षी दिवाळीत हाच आनंद इतरांच्या जीवनात फुलवण्याचा प्रयत्न मुंबईतील गुरूनानक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्याथ्र्यांनी केलाय. पनवेलजवळील शांतीवन आश्रमात वृध्दांसह व कृष्ठरोग्रस्तांबरोबर त्यांनी दिवाळी साजरी करीत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिलाय.
दिवाळीनिमित्त मुंबईतील गुरूनानक महाविद्यालयाच्या राज्य शास्त्र विभागाच्या पहिल्या दुस-या व तिस़-या वर्षातील ६० विद्याथ्र्यांनी पनवेलजवळली शांतीवन आश्रमाला भेट दिली. आजी आजोबा व कुष्ठरोगग्रस्तांना दिवाळी फराळ व भेटवस्तू व २०० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. आजी आजोबांना त्यांच्या नातवंडाचे प्रेम देण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केला. यावेळी त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.तसेच त्यांना कामातही मदत केली.आजी आजोबांशी मनमुराद गप्पा मारताना त्यांचे दु:ख पाहून विद्याथ्यांच्या डोळयात अश्रू तरळले. प्राचार्य डॉ विजय दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाचे प्राधाध्यापक सुमीत खरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या पाच वर्षापासून राज्यशास्त्राच्या विद्यार्थी हा उपक्रम राबवित आहेत. समाजाचे आपण काही देणं लागतो. तसेच मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे त्या हेतूनेच हा उपक्रम राबविला जात असल्याचे खरात यांनी सांगितलं.