गुरूदीपने वाढदिवस साजरा केला, पूरग्रस्त नागरिकांसोबत
म्हात्रे कुटुंबीयांचा उपक्रम, हजारो नागरीकांनी मानले आभार !
डोंबिवली : पश्चिमेतील प्रभाग क्रं.५१ चे शिवसेनेचे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी समाजसेवक गोरखनाथ सखाराम म्हात्रे यांनी आपला मुलगा गुरूदीप याचा वाढदिवस साजरा न करता, मुलाच्या वाढदिवसाचा खर्च पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी वाटप करण्यात आला. म्हात्रे कुटुंबियांच्या वतीने प्रभागातील हजारो पूरग्रस्त नागरिकांना 5 किलो तांदूळ व कपडे, साडी, बिस्किटे आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी गुरूदीपने पूरग्रस्त नागरिकांसोबतच आपला वाढदिवस साजरा केला.
अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात डोंबिवली पश्चिमेतील नवीन देवीचापाडा, साईनगर, गोपीनाथ चौक, जगदंबा माता मंदिर परिसरातील हजारो नागरिक बाधित झाले आहेत. महापुराच्या वेळी या परिसरातील बैठ्या चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यात लहान मुलांसह एक कुटुंब अडकले होते, मात्र जीवाची बाजी लावून गोरखनाथ म्हात्रे, पालिकेचे अभियंता महेश गुप्ते 10 फूट पाण्यातून पोहत जाऊन त्यांचा जीव वाचवला. तर परिसरातील कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना वाचविण्यात मोठी मदत केली. मात्र या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांनी म्हात्रे कुटुंबाचे आभार मानले आहे.
****