छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारली…

महाड / निलेश पवार : रायगड जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले तर महाड क्रांतीभूमी चवदार तळे येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच पुतळयाला अभिवादन करून पालकमंत्री पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रवक्ता मिलींद पाटील, युवा सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहीते, उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी,प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते. महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या उत्सावाला महाडमध्ये सुरूवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चव्हाण यांनी वीरेश्वर मंदिरात जाऊन श्री वीरेश्वराचे दर्शन घेतले. व पुढील नियोजीत अलिबा येथील नियोजनाच्या बैठकीला रवाना झाले.

महाडच्या समस्या पालकमंत्रयानी जाणून घेतल्या
पालकमंत्री चव्हाण यांनी महाडमधील कामांचा आढावा घेत समस्या जाणून घेतल्या. रायगड जिल्हा क्षेत्रफळाने मोठा जिल्हा असल्याने आपण सर्वत्र पोहचू असे नाही. कामगार कल्याण केंद्र महाड पाणी प्रश्न व काळकुंभे जलविद्युत प्रकल्प महाड प्रशासकीय भन याविषयी माहिती घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे सांगितले. तसेच रस्त्यांबाबत शासनाने नवीन धोरण अवलंबिलेले असून पी सी इन्डेक्स अंर्तत रस्त्यांची कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गासाठी भरपूर निधी उपलब्ध असून कोणत्याही शेतक- याचा एक रूपया राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यापुढे भाजप स्वबळावर लढणार
पक्ष्रवाढीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की यापूर्वी युतीमुळेच या भागात पक्ष वाढू शकला नाही पण यापुढे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात शतप्रतिशत भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *