महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर AAP चा गुजरातमध्ये निवडणूक प्रचार
दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या बवाना पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीने यश मिळवल्यानंतर आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आप उतरणार आहे. त्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रचाराचा शुभारंभ करणार आहे.
वर्षअखेरीस गुजरात विधानसभा निवडणूक होत आहे. आम आदमी पार्टीने गुजरातच्या निवडणुकीची धुरा गोपाळ राय यांच्याकडे सोपवली आहे. निवडणुकीची रूपरेखा आखण्यात आली असून २ ऑक्टोबरला रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे नेतृत्व ते स्वत: करणार आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गेल्या महिन्यात पक्षाने असीम विधानसभा मतदार संघात संघटनात्मक बांधणी केली आहे या मतदारसंघाची पहिली यादी जाहिर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलय.