गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या सत्तेचा फैसला काही तासातच ..

गुजरात : सा-या देशाचे लक्ष वेधलेल्या गुजरात विधानसभा निवडणुक तसेच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणीचा निकाल आज लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. सर्वच एक्झिट पोलने भाजपच्या बाजूने कौल दिलाय तर काँग्रेसने आमची सत्ता येईल असे भाकीत केलयं त्यामुळे सत्तेची माळ कुणाच्या गळयात पडते हे पाहण्यासाठी अवघ्या तासाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ व १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. गुजरातच्या ३३ जिल्ह्यांतील ३७ केंद्रांवर मतमोजणी होणार असून , १२५१ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.  हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ४२ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. गुजरात निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेची केली हेाती तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांनाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता. पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर, दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनीही भाजप पुढं आव्हान उभं केलय. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!