पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा अवयवदानाचा संकल्प
लातूर : अवयवदान काळाची गरज निर्माण झालेली असून शासनाच्या माध्यमातून अवयवदान जागृती मोहिम मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. लातूर जिल्हयात काही दिवसापूर्वी किरण लोभे या तरुणाने अवयवदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. अवयवदानाची चळवळ आगामी काळात लोकचळवळ बनावी या हेतूने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी अवयवदानाचा संकल्प करुन त्या संबंधीचा अर्ज भरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. राजाराम पोवार यांच्याकडे सादर केला.
राज्य शासन महाअवयव दान मोहिम संपूर्ण राज्यभरात राबवित असून या मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला जात आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना विविध अवयव यांचे रोपण करून त्यांना एक चांगले जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अवयव दान करण्याचा संकल्प करून प्रत्यक्षात अर्ज ही भरला.यावेळी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, महापोर सुरेश पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, अरविंद पाटील, डॉ. राजाराम पोवार, डॉ. शैलेश चव्हाण अदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *