डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला ठाणे जिल्हाध्यक्षा सारीका गायकवाड यांच्या वतीने डोंबिवलीत ‘शरद महोत्सव २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री व प्रदेश जयंत पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे शानदार उद्घघाटन पार पडलं. डोंबिवली पूर्वेतील नेहरू मैदान येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २६ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव आहे.

महोत्वाच्या उद्घघाटनप्रसंगी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कला, संस्कृती, परंपरा, क्रिडा गृह उद्योग या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मला विश्वास आहे की कल्याण डोंबिवली येथील नागरिक या महोत्सवास भरभरून प्रतिसाद देतील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील मनपा निवडणुकीत ६५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा शहराला केली होती. पण शहराला त्यातले काहीच मिळाले नाही. कल्याण डोंबिवलीकर येत्या निवडणुकीत त्या ६५०० कोटींचा हिशोब मागतील याबाबत माझ्या मनात शंका नाही असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजप नेत्यांकडून केली जाते. याबाबत जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार केला. ओबीसी आरक्षणाबाबतचा इमपरिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होतं. दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे, त्यात इमपरिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचं विधान केले होतं. आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात देताना त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, असं विरोधी विधान केलं. आता म्हणतात की डेटा उपलब्ध नाही, या सगळ्या भूलथापा केंद्र सरकारच्या भाजपच्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठे नुकसान केलंय, असे जयंत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

जयंत पाटलांचा लोकल प्रवास…
येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या ही लक्षणीय वाढ झालेली असेल तर नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला व महाविकास आघाडी झाली तर भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईहून डोंबिवली असा त्यांनी ट्रेन ने प्रवास केला या कार्यक्रमास कल्याण जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड आणि पक्षातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *