डोंबिवली: दसरा सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कपड्याचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन डोंबिवली येथे नुकतेच करण्यात आले. सर्वेश मंगल कार्यालय टिळक नगर डोंबिवली पूर्व येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मीना गोडखिंडी आणि सर्वेश मंगल कार्यालय संचालक समाजसेविका सुनिता फाटक यांच्या हस्ते करण्यात आले.
५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जे असते त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शन डोंबिवली करांनी लाभ घ्यावा असे हातमाग कापडाचे प्रदर्शन चे प्रमुख योगेश पोतन यांनी केले आहे. भारतीय संस्कृतीचा आणि हातमाग यांच्या प्रचारासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत असे पोतन म्हणाले. हातमागवरील विणकाम करून वापरण्यात योग्य कापड तयार केले जात आहे कपड्याचे वापर मुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचारोग होत नाही. मात्र हे कापड तयार करण्या साठी मनुष्यबळ अधिक लागत असल्याने व विक्री दर्जापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने सध्या हातमाग कपड्याचे निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. या प्रदर्शन प्रसंगी पांडुरंग पोतन, बाळू कोडम, गोवर्धन कोडम, दीपक गुंडू पुरुषोत्तम पोतन, श्रीनिवास दुसरा मधुकर सुरम लक्ष्मण उडता श्रीकांत श्रीराम अशोक बालाजी उपस्थित होते
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कॉटन साडे इरकली साडी मधुराई साडी पटोला साडी सेमी पैठणी खाली कॉटन खाली सिल्क पटोला ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल टॉप पीस खान साडी सोलापूर सुप्रसिद्ध चादर डबल बेडशीट रजाई पंचा टॉवेल सतरंजी लुंगी पिलोकावर बंडी पायजमा कुर्ता लेडीज गाऊन लेडीज अँड बॅग वॉल हैंगिंग असे विविध प्रकारचे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत सूचित व खादी कापडाचे विक्रीवर 20% टक्के सूट ठेवण्यात आली आहे असून या डोंबिवलीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा हा प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.