ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग गट क्रमांक 1 मधील शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित निबंध, वक्तृत्व, पथनाट्य आदी विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी सुनील म्हसकर यांनी ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबाबत ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम आणि शिक्षण विभागाच्या गट अधिकारी संगीता बामणे यांच्या शुभहस्ते सुनील म्हसकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी गट प्रमुख किशोर किणी, सीआरसी समन्वयक श्वेता आंबेरकर, मुख्याध्यापिका संस्कृता पितळे, प्रभावळकर, शुभांगी सीनकार, सफिक शेख आदी मान्यवर तसेच सर्व मनपा अनुदानित,कायम विना अनुदाननित (प्राथ./माध्य./ ज्युनि. कॉलेज) शाळांतील बक्षिसपात्र विद्यार्थी व शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.
सुनील म्हसकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल टीचर’ या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असलेले आणि ‘शारदासुत’ या टोपण नावाने साहित्य लेखन करणारे प्रज्ञावंत साहित्यिक आणि स्वामी विवेकानंद संस्था पाली, शहापूर या सामाजिक क्षेत्रातील नामवंत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सुनील म्हसकर सर यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबाबत आणि त्यांच्या या सत्काराबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे!