बजेट हजारो कोटींचा, पण शौचालयालाचे दरवाजे तुटलेले !
महिलांची होतंय कुचंबना : स्वच्छ भारत अभियान  यशस्वी  होणार ?

घाटकोपर ( निलेश मोरे ) : एकीकडे स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून जोरदार पावले उचलली जात असतानाच दुसरीकडे मात्र शौचालायचे दरवाजे तुटलेले असल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उजेडात आलाय. शौचालायचे दरवाजे तुटलेले असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हजारो कोटींचा बजेट असणाऱ्या पालिकेला तुटलेले दरवाजे दुरुस्त करता येत नाहीत का ?  असाच सवाल उपस्थित होत आहे.

घाटकोपरच्या रामजीनगर येथील 12 शौचकुपांची अवस्था खूपच बिकट झाली असून यातील 6 शौचकूपे पुरुष आणि 6 शौचकुपे महिलांसाठी आहेत. रामनगर हा खंडोबा टेकडीचा उतरता भाग असून येथे मोठ्या प्रमाणात झोपड्या वसल्या आहेत. येथे अष्टविनायक सोसायटी , अजिंक्यतारा सोसायटी, छत्रपती सोसायटी , साई बोलो ग्रुप अशा मिळून 6 सोसायटी आहेत या 6 सोसायट्या मिळून एकूण 450 ते 500 घरे असतांना केवळ 12 शौचकुपे नागरिकांना वापरासाठी आहेत. मात्र त्यांची अवस्था बिकट असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे 12 ही शौचकुपाचे दरवाजे तुटल्याने महिलांना मोठ्या समस्येतून जावे लागते. शौचालयाला जाताना तुटलेला दरवाजा उचलून तो बंद करावा लागत आहे. या रोजच्या कसरतीला नागरिक कंटाळले असून पालिकेच्या कारभारावर तीव्र चीड व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या गंभीर समस्येकडे पालिका कधी लक्ष देईल याच प्रतिक्षेत घाटकोपरवासिय आहेत.

प्रतिक्रिया :
शौचालयांचे दरवाजे तुटल्याने आम्हा स्त्रियांना शौचालयात जायला लाज वाटते. शिवाय तुटलेले दरवाजे हे खूप जड आहेत. त्यामुळे ताकद लावून ते उचलून बंद करावे लागत आहेत. पालिकेकडे याबाबतीत तक्रार केली आहे मात्र अद्याप कुणीही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आता नागरिक रस्त्यात उतरणार आहेत (आशा अशोक बैरागी, स्थानिक रहिवाशी)
——-

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *