डोंबिवली : गतका खेळाच्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी १६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे सराव शिबिर संपवून महाराष्ट्राचा संघ गोव्यात दाखल झाला आहे. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान पणजीतील डॉ. बांदोडकर कंपल ग्राऊंड येथे स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ११ मुली सहभाग घेत आहे. गतका खेळातील सिंगल सोटी टीमची प्रगती महांगडे (सातारा), तनया मंचेकर (रायगड), शिवानी गायकवाड (नवी मुंबई), कोमल शिंदे (पुणे), सिंगल सोटी इंडिविज्युअल डेमोची मानसी पाटील (रायगड), फरीसोटी टीमची श्रुती अंभोरे (परभणी), शिवानी कदम (परभणी), श्रद्धा घोडे (पुणे), अश्विनी देवकर (सोलापूर), फरीसोटी इंडिव्हिज्युअल डेमोची मिलनप्रीत कौर खोकर (ठाणे), इंडिव्हिज्युअल डेमोची सुदिक्षा शिरसागर (पुणे) यांची अशा पाच क्रीडा प्रकारांमध्ये निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी जनरल सेक्रेटरी असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्रच्या प्रा. आरती चौधरी यांची कोच म्हणून निवड झाली आहे. टीमच्या मॅनेजरपदी प्रा. सागर कुडले यांची निवड झाली. तसेच प्रा. सुरज गायकवाड आणि मंथन पवार या राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन खेळाडूंना शिबिरामध्ये प्राप्त झाले. असोसिएशन ऑफ गतकाचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष अश्विनी महांगडे, कोषाध्यक्ष सायली जाधव यांच्यासह सदस्यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.