भुसावळ : ज्ञान ज्योती विद्यालय खडके, तालुका भुसावळ या शाळेतील २००० च्या बॅचच्या दहावीच्या विद्याथ्यांचा २२ वर्षानंतर स्नेहमेळावा पार पडला. विद्यार्थ्यांनी गुरूजनांसमवेत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठा उत्साहात संपन्न झाला.
ज्ञान ज्योती विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले होते. आपल्या बालपणाचे मित्र, मैत्रीणी तब्बल २२ वर्षांनी भेटल्याने प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण एकमेकांची आस्थेने चौकशी करीत होते. या निमित्ताने माजी आमदार दिलीप भाऊ भोळे , समाजसेवक गिरीश भाऊ तायडे, खडके गावचे सरपंच विलास सपकाळे, खडके शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक मंडळ अध्यक्ष अनिल वारके, सचिव केशव धांडे, चेअरमन प्रमोद भोळे, व सर्व संचालक मंडळ तथा शाळेचे मुख्याध्यापक भिरुड सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांचा विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक भिरूड सर यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खडके गावातील माजी विद्यार्थांनी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी अजय सांबरे, दारासिंग पाटील, शफिक अली, हेमंत महाजन, तुषार खाचणे, प्रशांत नारखेडे, धीरज तिवारी, शिवाजी पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
असा रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ….