डोंबिवली :  रनर्स क्लँन ग्रुपचे धावपट्टू येत्या२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली असे ६० कि मी चे अंतर धावून पार करत  मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्याचा प्रयत्न करणार आहेत,  या निमित्ताने ते देशातील सर्व नागरिकांना देशासाठी एकत्र येऊन, राष्ट्र समृद्ध व बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ही करणार आहेत. राष्ट्र जनजागृतीच्या ह्या उपक्रमामध्ये एकूण ३० खेळाडू भाग घेणार आहेत.२६ जानेवारी २०२१ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते मध्यरात्री खेळाडूंना  हिरवा झेंडा दाखवून मँरेथॉनला  सुरवात करून सकाळी ८-९च्या दरम्यान  डोंबिवलीमधील शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चर स्मारक परिसरात तिरंग्यास मानवंदना देवून ही धाव पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी  खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी, शहिदांना मानवंदना देण्यासाठी आवर्जून याठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.-

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *