काही ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळत मटण खरेदी तर काही ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

कल्याण :… सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोनाची. कोरोनाचा कहर काही केल्या संपताना दिसत नाहीये. आषढातील अमावस्या, दीप आमावस्या उद्या असून आज रविवार असल्याने कोरोना काळातही नॉनव्हेजप्रेमी गटारी विसरलेले नाहीत. मंगळवारपासून श्रावण सुरू होणार आहे. उद्या सोमवार असल्याने आजचा रविवारचा दिवस खवय्यासाठी स्पेशल ठरला.

दरवर्षी पावसाचा आनंद घेत पर्यटन स्थळी गटारी साजरी करण्याचा आनंद मात्र यंदा लोकांना लुटता येणार नसला तरी आजच्या लोकडाऊच्या शेवटच्या दिवसाचा विचार न करता नागरिकांनी गटारीनिमित्त चिकन मटण खरेदीला प्राधान्य दिलेले दिसून आहे.
सकाळपासूनच चिकन मटण, मच्छी, विक्रेत्यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी दुकानात जय्यत तयारी ठेवली होती. तर सकाळपासून नागरिकांच्या लांबच लांब रांगा या करोनाची आणि लोकडाऊनची नागरिकांनी धास्ती सोडल्याचे दाखवून देत होत्या .काही दुकानाबाहेर सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात होते ,दुकानदार नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवत रांगेत उभे राहण्याचे आवाहन करत होते दुकानाबाहेर सॅनिटायझर करतानाही काही दुकानदार दिसत होते. तर काही ठिकाणी मात्र सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडालेला दिसून आला . कारवाईच्या भीतीने नागरिकांनी मास्क परिधान केल्याचे दिसून आले. कोरोनाचे गडद सावट असले तरी खवय्या प्रेमी मात्र आपली गटारी साजरी करण्याच्या पक्क्या इराद्याने बाहेर पडलेले दिसत आहेत

——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!