ठाणे :गटारी अमावस्या आणि त्यातच रविवार आल्याने कल्याणकरांनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या. कल्याणच्या फडके मैदानाजवळील दुकानात ही गर्दी पाहायला मिळाली.
गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आज मांसाहार प्रेमींनी सकाळपासूनच मटण आणि चिकन च्या दुकानाबाहेर रांगा लावल्या. गटारीच्या निमित्ताने अनेकांनी पार्टीचेही आयोजन केले आहे.