डोंबिवली क्रिडासंकुलात लग्नातील अन्नपदार्थ व कच- याचे साम्राज्य : नागरिकांमध्ये संताप : मनसे विद्यार्थी सेनेचा पालिकेला इशारा

डोंबिवली : येथील हभप सावळाराम महाराज क्रिडासंकुल हे लग्नासाठी भाडयाने दिले जाते मात्र लग्नाच्या कार्यक्रमानंतर अन्न पदार्थ आणि कचरा तसाच मैदानात टाकला जातो. आज पून्हा हा प्रकार घडल्याने जॉगिंगसाठी आलेल्या डेांबिवलीकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. डोंबिवली मनसे विद्यार्थी सेनेने हा कचरा त्वरीत न उचलल्यास पालिका अधिका-यांच्या केबीनमध्ये फेकण्याचा इशारा दिलाय.

डोंबिवली क्रिडासंकुलात रविवारी लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर, मैदानात तसेच जॉगिंग ट्रॅकवर उरलेले अन्न पदार्थ आणि पत्रावळींचा कचरा टाकण्यात आलाय. त्यामुळे मैदानात प्रचंड दुर्गंधी पसरलीय. सकाळी मैदानात जॉगिंगसाठी आलेल्यांना दुर्गंधीच प्रचंड त्रास सहन करावा लागला. याची माहिती मिळताच मनसेचे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे यांनी मैदानात घटनास्थळी धाव घेऊन मैदानात कच- याचा व्हिडीओ काढला. पालिकेचे आरोग्य निरीक्षक राहातळकर यांना मोबाईलवर फोन करून सदर प्रकाराची माहिती दिली. मैदानावरील कचरा त्वरीत उचलण्याची मागणी केली. खासगी मैदानात लग्न सोहळे कार्यक्रम होत असतात मात्र त्याठिकाणी असा कचरा होत नाही. मग पालिकेच्या क्रिडासंकुलात असा कचरा कसा काय होतो ? असा सवाल जेथे यांनी उपस्थित केलाय. डोंबिवली क्रिडासंकुलात लग्न सोहळे पार पडल्यानंतर कचरा व अन्नपदार्थ टाकण्याचे प्रकार अनेकवेळा प्रकार घडत आहेत मात्र पालिकेकडून याची गंभीर दखल घेण्यात येत नाही. मैदान हे प्रथम लोकांच्या सुविधेसाठी आहे. पालिकेना उत्पन्न मिळविण्यासाठी नाही. त्यामुळे यापुढं असा प्रकार घडल्यास मैदानावरील कचरा पालिका अधिका- यांच्या केबीनमध्ये आणून टाकण्याचा इशारा जेथे यांनी दिलाय.
़़़़़़

One thought on “डोंबिवली क्रिडासंकुलात लग्नातील अन्नपदार्थ व कच- याचे साम्राज्य : नागरिकांमध्ये संताप : मनसे विद्यार्थी सेनेचा पालिकेला इशारा”
  1. नूकताच या सावळाराम म्हात्रे या क्रिडा संकूलावर मिसळ महोत्सव हा कार्यक्रम झाला तोच कचरा असावा असे वाटते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *