डोंबिवली : डोंबिवलीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेने सुशिक्षित व सुसंस्कृत नगरी हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह २३ जणांना ताब्यात घेतलं आहे .यामध्ये आरोपिमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकार्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे .
डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तिच्यावर आठ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली ते ऐकून पोलीसही हैराण झाले. जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला .हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत २९ जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवली अशा विविध ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला .मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २३ जणांना ताब्यात घेतलं आहे त्यामधील दोन अल्पवयीन आहेत. २१ आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत .
कल्याण प्रादेशिक पूर्व विभागाचे अपर आयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले, पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव वा तपासात हस्तक्षेप नाही. 29 आरोपींची नावे सांगणाऱ्या तक्रारदार मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती सुस्थितीत आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे.
कल्याणातही चिमुकलीवर अत्याचार
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच कल्याण मध्ये देखील ८ वर्षाच्या चिमुकलीवर ट्युशन टीचर ने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली .या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत या नराधमला अटक करण्यात आली आहे .या नाराधाला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .दरम्यान सदर पीडित मुलगी आरोपिकडे अनेक महिन्यांपासून ट्युशन साठी जात होती. दीड महिन्यापूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती, घडलेल्या प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीतीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला .त्यानंतर या नराधमाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे
[…] […]