मुंबई : ‘हे विघ्नहर्त्या, सर्व दु:खाचे तू निवारण करून आम्हाला भयमुक्त जीवन दे. पुढच्या वर्षी मांगल्याच्या चिन्हांसह आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी तू ये’, अशा आशयाचे मागणे मागत भाविकांनी लाडक्या बाप्पाला भावूकतेने निरोप दिला.

कोरोनाच्या तिस- या लाटेचा धोका असल्यानं राज्य सरकारने विशेष खबरदारी घेत गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नियमावली जारी केली होती. विसर्जनासाठी सरकारने नियमावली आखून दिली हेाती त्यामुळे दहा दिवस बाप्पाची विधीवत पूजा केल्यानंतर विसर्जन पार पडलं मुंबईतील लालबागच्या राजा आणि तेजूकाया मंडळाच्या गणपतीचे शांततेत विसर्जन पार पडलं. पुण्यात श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचा विसर्जन सोहळा विश्वस्त व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पार पडला.

चिमुकल्याची भावनिक साद 
कल्याण पुर्वेकडील शिवाजी कॉलनी येथे काळकुटे कुटुंबाकडे गणरायाचे आगमन झाले होते. आज विसर्जनासाठी बाप्पाला घेऊन जात असताना कुटुंबातील चार वर्षाच्या आर्यनने  बाप्पाला घेऊन जाऊ नका असा हट्ट धरला. माझ्या बाप्पाला घेऊ नका ,असा हट्ट करत कुणालाही बाप्पाला हात लावून देत नव्हता. चिमुकल्याच्या बालहट्टाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे .अखेर कुटुंबाने तासभर आर्यनची समजूत काढली ,संपूर्ण कुटुंबाची समजूत काढताना दमछाक झाली .बाप्पाला घरी पाठवलं आहे अशी समजूत काढत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले .

वर्षा निवासस्थानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसज्रन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पर्यावरण मं़ी आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या निवासस्थानी पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!