ठाणे : अवघ्या महिनाभरावर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे, मात्र कल्याणच्या कुंभरवाड्यात शुकशुकाट आहे.  कारागीर मूर्ती बनविण्यात व्यस्त असले तरीसुद्धा मागील वर्षीपेक्षा यंदा गणेशमूर्तींची निम्मी बुकिंगही  झालेली नाही.त्यामूळे मूर्तिकारांची चिंता अधिकच वाढत चाललीय. त्यामुळे या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या  मूर्तीकारांपुढं मोठा प्रश्न निर्माण झालाय.

कल्याण पश्चिमेकडील कुंभारवाड्यात मूर्ती बनवण्याचे ५०  कारखाने आहेत .कुंभार वाड्यात राहणारे अनेक कुटुंब याचं कामावर त्याचा उदरनिर्वाह चालवतात गणेशमूर्तीं बनवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. साधारणपणे एप्रिल महिन्यापासून गणपती मूर्ती बनवण्याच्या कामाला कुंभार बांधव सुरवात करतात.  गणपती आणि नवरात्रीमध्ये काम करून वर्षभराची पुंजी जमा करतात आणि त्यावर पुढील वर्षापर्यंत उदरनिर्वाह चालवतात. मात्र कोरोनामुळे त्यांच्या या पारंपरिक व्यवसायावरही गदा आलीय .लॉकडाऊन मुळे निर्माण झालेले आर्थिक संकट व कोरोनाची भीती ,कोरोना काळातील निर्बध असल्याने मंडळांनी मागिल वर्षापासून गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सहाजिकच मूर्ती खरेदी केली जात नाहीय . परिणामी गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला असला तरी या कुंभारवाड्यात मात्र शुकशुकाट आहे  असे मूर्तीकार गणेश कुंभार यांनी सांगितलं..
 

दोन महिने अगोदरच गणेशमूर्ती तयार केल्या जायच्या मात्र यंदा बुकिंग केल्या नंतरच गणेशमूर्ती बनवल्या जात आहेत .गेल्या वर्षी कोरोना काळात झालेल्या बुकिंग पेक्षाही यंदा कमी बुकिंग असल्याचं मूर्तीकारांकडून सांगण्यात आले .गेल्या वर्षी कोरोनाकाळात मूर्तीकारांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप त्याबाबत सरकारने काहीच  निर्णय घेतला नाही त्यामुळे सलग दोन वर्षे नुकसान सहन करणाऱ्या मूर्तीकाराचा सरकारने विचार करावा अशी मागणी मूर्तिकार अनिल कदम यांनी  केली . 

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Linkdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *