डोंबिवली ; “ आपला बाप्पा आपणच बनवू या “ हि संकल्पना घेवून पर्यावरण पूर्वक शाडूच्या माती चा एक ते दीड फूट उंचीचा गणपती बनवण्याची कार्यशाळा ‘रिजन्सी विमेन क्लब ‘ तर्फे आज दिनांक ६ ॲागस्ट रोजी रिजन्सी क्लब हाउस मधे आयोजित करण्यात आली होती .
या वर्षी सरकारने प्लास्टर ॲाफ पॅरीसच्या मूर्तींवर बंदी घातल्यामूळे प्रत्येकाने नैसर्गिक मातीची मूर्ती स्वत: तयार करून आपला घरगूती गणेशोत्सव साजरा करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे ही यामागची धारणा होती शिल्पकार गुणेशजी अडवल व त्यांचा सुपूत्र सोहम ह्यांनी गणपती मूर्ती बनवण्याचे तंत्र सहज सोपे करून शिकवले , रिजन्सी विमेन क्लब नेहमीच पर्यावरण रक्षणाचा विचार करून प्रकल्प राबवित असते . अशी माहिती रिजन्सी वुमेन क्लबचा प्रेसिडेंट रोहिणी लोकरे यांनी दिली.