ठाणे : राज्य शासनाने येत्या २२ ऑक्टोबरपासून नाटयगृह खुलं करण्याची परवानगी दिलीय. मात्र ठाण्याचं गडकरी नाटयगृहाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही.तर दिवाळी पहाट कार्यक्रमही होणार नसल्याने कलाप्रेमी ठाणेकरांचा हिरमोड झाला असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे  बंद असलेल्या नाट्यगृहाचे दरवाजे उघडण्याची प्रेक्षक आणि कलाकारांना प्रतीक्षा होती.मात्र राज्य शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने नाट्यगृह सुरु होत नव्हते. मात्र कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून राज्य शासनाने परवानगी दिलीय त्यामुळ नाटयप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या डागडुजीचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे नाटयगृहाचा पडदा उघडला जाणार नाही. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात शुक्रवारपासून नाटयगृह सुरू होत असतानाच गडकरी रंगायतनचा पडदा महिनाभर उघडणार नाही आणि तिसरी घंटाही वाजणार नाही. त्यामुळे रसिकांना नाटकालाही मुकावे लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नाट्यरसिकांना सोबत नाट्य कलावंतांचा देखील हिरमोड झाला आहे अशी टीका डावखरे यांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!