रोटरी क्लबतर्फे २०० त़ृतीयपंथी, वारांगणांचे मोफत लसीकरण

डोंबिवली : कोविड ची रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी  मोठया प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे.परंतु या लसीकरणात समाजातील तृतीयपंथी आणि वारांगना महिला   वंचित राहिलेल्या दिसून येत आहेत. अशा तृतीयपंथी आणि वारांगना डोंबिवली मधील ग्लोबल राईट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या सहयोगाने मोफत लसीकरण पार पडल. यावेळी कल्याण डोंबिवली परिसरातील  २०० तृतीयपंथी आणि वारांगना यांना मोफत  लसीकरण  करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगर परिसरात ३५०० हजार तृतीयपंथी असून कोविड काळात सरकार मायबापाने आमच्याकडे हवं तसं लक्ष दिलं नाही आता लसीकरण तरी होईल का ? मतदानाचा हक्क दिला, आम्ही मतदान करतो तरीही आमच्या पर्यंत कुठलीही मदत पोहोचत नाही. कोवीड काळात ५ हजार रूपये, मोफत धान्य देण्याचे जाहिर केले पण आम्हाला मदत मिळाली नाही अशी खंत व्यक्त करीत आहेत. कोवीड काळात लक्ष दिलं नाही पण आता लसीकरण तरी करा अशी विनंती त्यांच्याकडून राज्यसरकारकडे केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *