डोबिवली : डोंबिवली शहर काँग्रेस कमीटी बी ब्लॉक पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांच्या पुढाकाराने आयरे परिसरात बालकांसाठी मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबीराचा शेकडो बालकांनी लाभा घेतला. साईनाथ झोपडपट्टी न्यू आयरे रोड डोंबिवली पूर्वे या ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात आले हेाते.

शिबीरात ६ आठवडे ते १४ आठवडे आणि ९ महिन्यांपासून ते १६ वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत लस देण्यात आली. विविध प्रकारच्या लसींचा समावेश होता. कल्याण डोंबिवली महापालिका मढवी आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. या शिबीरात आरोग्य केंद्रातील डॉ मेघनाथ मगर, दिपाली दांडकर, वैभव वसोनार, डॉ पौर्णिमा हर्षल ढाके, किर्ती जोशी, अर्चना गलांडे, राजमल गवळी, रिंकू विरघट, उज्वला घोट, अश्विनी हिवाळे, स्नेहल इटाले, रूपाली शिगम, निलम पठारे, सुजाता कोळवणकर, मनस्वी कदम, समीक्षा पालशेकर, पल्ल्वी आवाळे, प्रगती गोडबोले, प्रकाश कोळी, विक्रम कदम, मनोज भोगे, अनिल धुळप, आकाश दाभोळकर, जॉन फर्नांडीस, कल्पना वाघ, या डॉक्टरांच्या टीमन चे तर आशा वर्कर चंद्रकला मनवर कविता मुंगळे अनुजा दाभोळकर सोनू खंदारे सीमा राणे राणी जैस्वाल मालती बडगुजर आदींचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!